ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना टी एस पी भत्ता 350 रूपये पगारात लागू करा

महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना डाटा अपलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र एफ एल डि 2019 प्र क्रं 258 फ 10 मंत्रालय मुंबई दिनांक 2 फेब्रुवारी 20240च्या शासन निर्णय नुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतः चा मोबाईल वापरण्यास मुभा देण्यात आली आहे, शासकीय कामाकरीता वैयक्तिक मोबाईल व इंटरनेट वापरण्याकरीता क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल वापर व इंटरनेट डाटा वापराकरिता प्रती महिना रु 350 शासनाकडून देण्यात आले आहे.

माहे फेब्रुवारी 2024 पासून क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना टी एस पी भत्ता पगारात लागू करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपूर चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे व सचिव कैलास सलामे यांनी उप वन संरक्षक, बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे.

निवेदनाच्या प्रती विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, बुलढाणा, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग अकोला, सहाय्यक वन संरक्षक, बुलढाणा व इतर अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये