ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर प्रशासनाने ‘आप’ची मागणी केली पूर्ण

बल्लारपूर नगरपरिषदेचा मुख्य जिना दुरुस्त ; मुख्याधिकारी न.प.बल्लारपूर यांचे आभार

चांदा ब्लास्ट

अनेक महिन्यांपासून बल्लारपूर नगरपरिषदेचा मुख्य जिना व रॅम्प पूर्णत: तुटलेल्या अवस्थेत असल्याने या विभागात येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना व वयोवृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

     शहराचे मुख्य कार्यालय असूनही सर्व जागरूक व जबाबदार लोकप्रतिनिधी सुद्धा या समस्येकडे दुर्लक्ष करत होते. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर प्रवक्ते आसिफ हुसेन शेख जी यांनी या गंभीर समस्येची दखल घेत मुख्याधिकारी विशाल वाघ साहेब, या प्रश्नावर तत्परता दाखवून काही दिवसात हे काम पूर्ण करून दिव्यांग व वृद्धांना दिलासा दिला. आसीफ हुसेन शेख जी यांनी मुख्याधिकारी न.प.बल्लारपूर यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये