ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाथरी येथे महिला काँग्रेस कमिटीतर्फे रक्षाबंधन सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलीस स्टेशन पाथरी येथे बुधवार रोजी रक्षाबंधन कार्यक्रम पार पाडण्यात आला. भावा बहिणीचा प्रेमळ नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन असा हा सन पोलीस स्टेशन पाथरीच्या प्रांगणात महिला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा उषाताई भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी म्हणून यावेळी उषाताई भोयर यांनी महिलांना संबोधतान्हा महिलांवर होणारे अत्याचार, शोषण, हिंसाचार, हुंडाबळी, आणि महागाई विरोधात महिलांनी एकत्र होऊन पुढे येण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित मान्यवर माननीय मंगेश मोहोळ ठाणेदार पाथरी, विजय खोब्रागडे ,रतन लेनगुरे, चंद्रशेखर शिडाम, नारायण येगेवार , सुरज शेडमाके, निलेश कोरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित होते ‌.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उषाताई भोयर,सावली महिला तालुका अध्यक्षा,लताताई वडलकोंडावार, डॉ. योगिताताई भसारकर,विजयाताई रत्नावार, पोर्णिमा लोडलीवार,वर्षाताई काटलाम,प्रीतीताई मेश्राम, जास्वंदाताई खोब्रागडे,जयश्री चेकबंडलवार,अर्चनाताई वाघधरे,सपनाताई कंकरवार, कोमलताई ,अरुणाताई संगिडवार,वैशालीताई सोनकर, सुनिताताई ठाकरे,राधाताई बनसोड, स्वातीताई मडावी,ह्याचे सहकार्य लाभले.
 महिलांवरील कुठल्याही प्रकारच्या होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांच्या सुरक्षिततेसाठी पाथरी पोलीस नेहमी खंबीरपणे  पाठीशी उभे राहू.
मंगेश मोहोळ,
ठाणेदार पो.स्टे.पाथरी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये