ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा तालुक्यातील निवासी पट्टे तात्काळ द्या : अल्का आत्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिढ्यानपिढ्या महसूल किंवा वन विभागाच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना निवासी पट्टे तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी भाजपा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम यांनी केली.

यासंदर्भात त्यांनी पोंभुर्णा येथील तहसीलदार शेलवटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी कुटुंबे अनेक वर्षांपासून शासनाच्या जागेवर वास्तव्यास असून त्यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या अर्जांवर निर्णय झालेला नसल्याने त्यांना वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

अल्का आत्राम म्हणाल्या की, या कुटुंबांकडे स्वतःची राहण्याची जागा असती तर त्यांना शासनाच्या जागेवर वास्तव्य करून आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला नसता. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे आवश्यक कागदपत्रांसह प्रलंबित आहेत, त्यावर तातडीने कार्यवाही करून त्यांना निवासी पट्टे देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली.

यावेळी रोशन ठेंगणे व रवींद्र गेडाम उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये