एफ.ई. एस. गर्ल्स हायस्कूल मध्ये पालक-शिक्षकसंघाची स्थापना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : स्थानिक एफ. ई. एस. गर्ल्स हायस्कूल मधील सावित्रीबाई फुले सभागृहात शिक्षक-पालक सभेचे आयोजन फीमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर चे अध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष मा.ॲड.श्री विजय मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींच्या पालकांची निवड करून पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. तसेच माता-पालक संघ देखील स्थापन करण्यात आला.
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री. किरण पराते सर यांनी प्रास्ताविकेतून पालक-शिक्षक संघ का आवश्यक आहे, याचे पालकांना महत्त्व समजावून सांगितले. तर मा. मुख्याध्यापिका सौ. छाया मायकलवार मॅडम यांनी पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या शिक्षणाबरोबर पालकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी मा.डॉ.श्री. बेले सर यांनी मार्गदर्शन करतांना.शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद होणे आवश्यक आहे असे सांगितले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष . विजयराव मोगरेसाहेब यांनी मातृभाषेचे महत्त्व तसेच पालक-शिक्षक संघाचे महत्त्व पालकांना समजावून सांगितले.
पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका सौ.छाया मायकलवार मॅडम, उपाध्यक्ष सौ. आशा भूषण भुजाडे,सचिव ,श्री. पिंपळकर सर, सहसचिव सौ. प्रिती दीपक डाखोडे,पालक सदस्य श्री. कैलास राजाराम ठेमस्कर, पालक सदस्या शबाना कलाम शेख, शिक्षक सदस्य श्री.सोमनकर सर, शिक्षिका सदस्या ज्योती चन्ने मॅडम, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.केतकी महेंद्र किनेकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या माता पालक संघाची पण स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन सौ. बोरीकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती चन्ने मॅडम यांनी केले. या प्रसंगी शिक्षक/शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होते.



