ताज्या घडामोडी

बोनगिरवार कुटुंबीयांनी केले सर्व गणेश मंडळांचे केले जंगी स्वागत – हजारो नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

सर्वपक्षीय नेत्यांनी लावली हजेरी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी व माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार व त्यांचे सुपुत्र मयुर ह्यांनी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील सर्व गणेश मंडळांच्या सदस्यांचे स्वागत व मिरवणुकीत सकाळपासून भक्तीत तल्लीन असलेल्या भक्तांना महाप्रसाद देण्याचा मानस ठेऊन त्यादृष्टीने नियोजन करून हजारो भक्तांना महाप्रसादाचा आस्वाद दिला.

दरवर्षी घरी स्थापन होणाऱ्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या भोजनावळी आयोजित करून नेमक्या विसर्जनावेळी तहानभूक विसरून उपाशीतापाशी राहुन भक्तीमार्गात तल्लीन असलेल्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या घरी होणाऱ्या भोजनावळीचा कार्यक्रम रद्द केला व भक्ती व सेवेचा नवा पायंडा स्थापित केला हे विशेष.

कार्यक्रमाची व्याप्ती व भव्यता लक्षात घेऊन त्यांनी समाजातील विविध घटकातील नागरिकांना सामील करून घेऊन त्यांनाही ह्यामध्यमातून सेवेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शहरातील सर्व मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दुपट्टा व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. यासह सर्व जातीधर्माच्या प्रमुख व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमस माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्यासह माजी उप नगराध्यक्ष सुनील देशपांडे, नरेंद्र पुराणिक, अभिजित धोटे, अर्चना भोंगळे, अरुण मस्की, सतिश धोटे, प्रशांत गुंडावार, विनायक देशमुख, केशवराव ठाकरे, बंडु साळवे, अशोक राव, प्रशांत घरोटे, सुरेश गाडगे, प्रदिप देशपांडे यांचेसह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधाकर  बोनगिरवार, प्रकाश बोनगिरवार ह्यांचेसह पांडुरंग चिल्लावार, विनोद नरेंदुलवार,  अभय पोषेट्टीवार, बबन घट्टूवार, विकास कल्लुरवार, अभय अपराजित, प्रसन्ना देशपांडे, मयुर गाडगे, संतोष देशमुख, मनोज व मंगेश माडुरवार, गजेंद्र झंवर, मनमोहन सारडा ह्यांचेसह ब्राम्हण, आर्यावैष्य, माहेश्वरी, कुणबी, सुतार ह्याचेसह सर्व समाजातील कार्यकर्ते व गणेशभक्तांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये