ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मल्लखांब” क्रीडा स्पर्धेत शिंदे महाविद्यालय विभाग स्तरावर

हर्षल उईके व अंकुश वाढई जिल्ह्यात अव्वल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मलखांब क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथील दोन विद्यार्थी विविध वयोगटात अव्वल आले व त्यांची निवड विभागीय स्तरावर झाली.

जिल्हास्तरीय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील हर्षल उईके हा १४ वर्षे वयोगटातील खेळाडू मल्लखांब क्रीडा प्रकारात अव्वल आला व त्याची निवड आता विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच अंकुश वाढई हा खेळाडू १७ वर्षे वयोगटात मल्लखांब या क्रीडा प्रकारात यशस्वी होऊन विभागीय स्तरावर त्याची निवड झाली आहे.

मल्लखांब हा क्रीडा प्रकार नव्यानेच यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांच्या प्रेरणेने सुरू झाले आहे. या क्रीडा प्रकारात पहिल्यांदाच या महाविद्यालयाने सहभाग घेतला असून यातून दोन खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झालेली आहे. हे दोन्ही खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभाग स्तरावर करणार आहेत.

मल्लखांब या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात विजयी होऊन विभाग स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त, माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, डॉ. प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी भद्रावती, डॉ. सुधीर मोते प्राचार्य, प्रा. रमेश चव्हाण क्रीडा प्रशिक्षक, डॉ ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, नरेश जांभूळकर, हरिहर मोहरकर, शुभम सोयाम तसेच सर्वं प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये