ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

PVR मल्टीट्रेडींग लॅब, वर्धा या फर्म कडुन आर्थिक फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 फिर्यादी व इतर यांना आरोपीने त्यांचे PVR मल्टीट्रेडींग लॅब, आर्वी नाका, वर्धा या फर्म च्या माध्यमातुन ट्रेडींग केल्यास गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर परतावा देण्याचे आमीष दाखवुन रक्कम स्विकारुन त्याबाबचे हमीपत्र लिहुन देवुन विश्वास संपादन केला. तसेच गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर सुरुवातीला मोबदला देवुन नंतर परतावा देण्याकरीता टाळाटाळ करुन फिर्यादी व इतर साक्षदारांची ची फसवणुक केली. फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन देवळी येथील अप. क्रमांक 0719/2024 कलम 316(2), 318(4), 3(5) BNS गुन्हा नोंद करण्यात आला. तपासा दरम्यान सदर गुन्ह्यात MPID कायद्याचे कलम 3, 4 नुसार कलम वाढ करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात PVR मल्टीट्रेडींग लॅब, या फर्मचा संचालक मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्बत वय 30 वर्ष, रा- गणेशनगर, बोरगांव मेघे वर्धा यास अटक करण्यात आली असुन त्यास वर्धा कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

तरी PVR मल्टीट्रेडींग लॅब, या फर्मचा संचालक मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्वत रा. बोरगांव मेघे वर्षा याचे द्वारे ईतर लोकांना रक्कम गुंतवणुक करणे करीता प्रोस्ताहीत करुन जास्त मोबदला देण्याचे आमीष दाखवुन फसवणुक झाली असल्यास असे गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा येथे संबंधीत कागदपत्रांसह हजर रहाण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांचेकडुन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये