ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व शरदराव पवार वरिष्ठ महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल,गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ व्या स्वातंत्र्य दिन निमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर संचालक नोगराज मंगरूळकर,माधवराजी मंदे, माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे,इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वर्षा खोडके, शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांचे सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पालक वृंद, शाळेतील शिक्षक वृंद प्राध्यापक,प्राध्यापिका विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये