ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टेकोडा घाटातुन अवैध्यरित्या वाळु उत्खनन

वाळु वाहतुक करणाऱ्यांविरूध्द कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        सविस्तर याप्रमाणे आहे की, आष्टी तालुक्यातील वाळु घाटातुन चोरटया मार्गाने मोठया प्रमाणात गौण खनिजाचे अवैध्यरित्या उत्खनन करून वाळुची अवैध्य वाहतुक होत असल्याने व हि वाळु दुप्पट तिप्पट किमतीने विकुन शासनाचा महसुल बुडवुन सर्वसामान्याची लुट करीत आहेत अशा माहीतीवरून मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन सा. वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  संजय गायकवाड यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिल्याने त्यांनी गौण खनिजाचे अवैध्य उत्खनन आणि अवैध्य वाळु वाहुकीला आळा घालण्याकरीता अधिनस्त अधिकारी व अमलदार यांना निर्देश दिले.

यावरून स्थानिक गुन्हे शाखा वर्धा द्वारे दिनांक 11.01.2024 रोजी तळेगाव शा.प. हददीतील वर्धा नदी पात्रातील टेकोडा घाटातुन अवैध्यरित्या वाळु उत्खनन करून वाळु वाहतुक करणारा एक ट्रॅक्टर आंनदवाडी गावाकडे येत असताना पकडुन टॅक्टर चालक नामे धनराज बाबुरावजी शेंडे, वय 34 वर्ष, रा. टेकोडा, ता. आष्टी व ट्रॅक्टर मालक राजेन्द्र नारायणराव चौधरी, रा. भारसवाडा ता. आष्टी यांचेविरूध्द पो.स्टे. तळेगाव शा.प. येथे गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर चालक याचे ताब्यातुन एक सोनालीका कपंनीचा DI-745 III टॅक्टर क. MH-32-AS-4489 व बिना कमांकाची ट्राली ज्यामध्ये एक ब्रास काळी रेती असा जु.कि. 8,58,000/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार स.पो.नि. संतोष दरेकर, पोलीस अमलदार मनोज धात्रक, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये