ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील प्रसिद्ध दंत डॉक्टरचे अपहरण

तीन लाखाची खंडणी मागितली ; नैसर्गिक विधीचा बहाना करून डॉक्टरने वाचविले प्राण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर जयेश मिनासे यांचा शहरातील जालना रोडवर खाजगी दवाखाना आहे दिनांक आठ च्या सायंकाळी गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून तीन अपहरण कर्त्याकडून त्यांना जबरीने गाडीमध्ये बसवून समृद्धी महामार्गावर त्यांच्याकडून जबरीने दोन लाख 98 हजार रुपये अकाउंटला ट्रान्सफर केले आणि 2000 नगदी तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला संबंधित डॉक्टरने नैसर्गिक विधीचा बहाना करून आरोपींची नजर चुकून तेथून पळ काढला आणि आपले प्राण वाचविले या संदर्भात दिनांक नऊ ला अज्ञात अपहरण कर्त्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरामध्ये प्रसिद्ध असे दाताचे डॉक्टर जयेश प्रदीप मीनासे पन्नास वर्ष यांचा जालना रोडवर खाजगी दवाखाना आहे घटनेच्या दिवशी सायंकाळी नेहमीप्रमाणे ते आपला दवाखाना बंद करून त्यांच्या दुचाकीवरून आपल्या निवासस्थानाकडे जात असताना दवाखान्यापासून काही अंतरावर असलेल्या रामाने कॉम्प्लेक्स समोर तीन अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांच्या दुचाकी समोर स्कार्पिओ गाडी लावून त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून स्कार्पियो मध्ये जबरदस्ती बसवले सिंदखेडराजा रोडवरील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ त्यांनी गाडी थांबवून चाकूचा धाक दाखवून सोडून देण्यासाठी एक करोड रुपयाची मागणी केली जीवाच्या भीतीपोटी संबंधित डॉक्टर यांनी त्यांच्या मित्राकडून दोन लाख रुपये आरोपींना नगदी दिले त्यानंतर आरोपींनी डॉक्टर यांच्या मोबाईल मधील यूपीआय पासवर्ड गळ्याला चाकूचा धाक लावून विचारून घेतला आणि त्यांच्या मोबाईल फोन पे वरून 98 हजार रुपये दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केले तसेच फिर्यादी डॉक्टर यांच्या खिशातून दोन हजार रुपये नगदी जबरीने काढून घेतले त्यांचा वापरातील मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये चा मुद्देमाल घेऊन फिर्यादी डॉक्टर यांना मारण्याची धमकी दिली. घटनेचे गांभीर्य पाहून जीव वाचवण्यासाठी डॉक्टर यांनी नैसर्गिक निधीला जाण्याचे कारण सांगून आरोपींची नजर चुकून घटनास्थळावरून पळ काढला आणि नातेवाईकांसह दिनांक नऊ च्या रात्रीला देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला संबंधित आरोपी विरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना पकडण्यासाठी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पथक रवाना झालेले आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम तसेच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींना पकडण्यासाठी पुढील दिशा निर्देश ठरवले घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे तसेच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहेत संबंधित घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी सांगितले, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सुद्धा भेट देऊन सूचना केल्या.

या अपहरण गुन्ह्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये