ब्रम्हपूरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ब्रम्हपुरी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती महोत्सव समीतीच्या वतीने मजबुती का नाम महात्मा गांधी या विषयावर अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक चंद्रकांत झटाले यांचे २ आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राजीव गांधी सभागृह कुर्झा रोड येथे व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोबतच सकाळी ८ वाजता शहरातील हुतात्मा स्मारक ते बाजार चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यान कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, महात्मा गांधी जयंती महोत्सव समीतीचे संयोजक अॅड गोविंदराव भेंडारकर, नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, रुरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव रुषीजी राऊत यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी पदयात्रेत व व्याख्यान कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे करावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजकांनी केले आहे.