ताज्या घडामोडी

इको-प्रो मध्ये कोणतीही फूट नाही; संस्था ‘एकजुट’ – बंडु धोत्रे

इको-प्रो संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

इको-प्रो संस्थेने काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्यांना कुठलाही पाठिंबा जाहिर केला नव्हता तर संस्थेचे अध्यक्ष बंडु धोत्रे ह्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र यासंदर्भात संस्थेने पाठिंबा दिल्यामुळे संस्थेत फूट पडत असल्याचे वृत्त्त प्रकाशित झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असुन संस्थेत कुठलाही वाद अथवा अविश्वास नसल्याचे तसेच इको-प्रो मध्ये कोणतीही फूट नाही; संस्था ‘एकजुट’ असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बंडु धोत्रे ह्यांनी संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे.

इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्तिगत निर्णय घेत काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारण्याची भूमिका घेतली. तसे व्यक्तिगत पत्र दिले, त्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी काँग्रेसमध्ये स्वागत करीत असल्याचे पत्र दिले. संस्था मागील 20 वर्षापासून आपल्या कार्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून आहे. तसे पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य यापुढेही निष्पक्षपणे सुरू राहणार आहे. बंडू धोतरे यांच्या काँग्रेस प्रवेशाने यावर कुठलाही फरक पडणार नाही. नेहमीप्रमाणे इको-प्रो संस्था आपली भूमिका घेताना सरकार कोणती आहे, कुणाची आहे? याचा विचार न करता आपल्या नेहमीच्या पद्धतीने कार्य करणार आणि भूमिका मांडणार आहे, असे सभेत स्पष्ट झाले.

संस्थेत कुठलीही फूट नसून, यापुढे सर्व सदस्य संस्थेसोबत राहून ‘एकजूट’ राहणार असल्याचे सर्वांनी एकमताने ठरविले. इको-प्रो संस्थेमध्ये अनेक विचाराचे, अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळ्या पक्षात काम जरी करत असले तरी, चंद्रपूर शहरासाठी किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नासाठी आम्ही सर्व एक आहोत आणि एक म्हणूनच आम्ही कार्य करत राहू अशी ग्वाही सर्वांनी दिली.

बैठकीत इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे यांच्यासह धर्मेंद्र लुनावत, ओम वर्मा, सुभाष शिंदे, अनिल अडगुरवार, बंडू दुधे, नितीन रामटेके, सुधीर देव, सचिन धोतरे, सुमित कोहळे, मनीष गावंडे, संजय सब्बनवार, विजय हेडाऊ, सुनील मीलाल, किशोर वैद्य, रवी गुरनुले, प्रकाश निर्वाण, सागर कावळे, राजू काहिलकर, योगेश गावतुरे, जितेंद्र वाळके, कपिल चौधरी, सुनील लिपटे, सनी दुर्गे, महेंद्र शेरकी आदी सदस्य उपस्थित होते.

“काँग्रेस सदस्य म्हणून म्हणून माझी व्यक्तिगत आणि स्वतंत्र भूमिका घेतली आहे, त्याचा संस्थेची कुठलाही संबंध नाही. इको-प्रो ही संस्था नेहमीप्रमाणे कार्य करताना, प्रत्येक विषयावर आपली स्पष्ट आणि निपक्ष भूमिका असेल, तेव्हा या भुमिकेसोबत आम्ही कायम असणार आहे. संस्थेत पूर्वीपासून अनेक पक्षातील सदस्य असून ते सुद्धा संस्थेत कार्य करीत आहेत, संस्थेत कुठलाही संभ्रम नसून आम्ही एकजूट आहोत.”

-बंडू धोतरे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये