Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महापूजेने गणेश दत्त गुरु पंचायतन मंदिरात श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायण सप्ताहाला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

            महापूजा तथा महाआरतीने शहरातील श्री गणेश दत्त गुरु पंचायतन मंदिरात श्री दत्त जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुचरित्र सिद्ध ग्रंथाच्या पारायण सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. हा सोहळा दिनांक 15 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. सकाळी महापूजा करण्यात आली, त्यानंतर मंदिरात सामूहिक मंत्रजाप करण्यात आला.

या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात भारुड, भजन संध्या, संगीत प्रवचन, दीप यज्ञ व संगीत महोत्सव, श्रीमद्भागवत गीता पठण, रांगोळी स्पर्धा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 ला सकाळी श्री दत्त जन्म सोहळा तथा सायंकाळी पाच वाजता मंदिरातून श्री दत्ताची शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. गोपालकाला व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.आज सकाळी पार पडलेल्या महापूजेत शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये