Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन 19 जानेवारीला.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालय व संगीत शिक्षक सुरेश चौधरी प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने रविवार 19 जानेवारी 2025 ला राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन स्थानिक सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालय येथे करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उदघाटन ख्यातणाम तबला वादक डॉ. देवेंद्र यादव यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कला उपासक कृष्णराव मंदुलवार हे राहणार आहेत. श्याम सरोदे व पुरुषोत्तम खासबागे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

तसेच पुरस्कार वितरण समारंभ ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ संद्या देशमुख यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील बुरांडे राहणार आहे.

यावेळेस उषा फाले, दामोदर राऊत, गणेश अतकर, सुनील ढोबळे, जयश्री कोटगिरवार,अजय हेडाऊ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

याप्रसंगी ज्येष्ठ कला साधक मनोहर देऊळकर व शशिकांत ठोंबरे यांना जीवन गौरव पुरस्काराणे तर यशवंत पलेरिया दिलीप वाकडे यांना संगीत भूषण पुरस्काराणे सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नागपूर येथील सुप्रसिद्ध गायक चेतन बालपांडे यांच्या सुश्राव्य गीताचा कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमाचा वर्धेकर रसिकानी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य समन्वयक किरण पटेवार स्पर्धा संयोजक शंकर तिखे व यशवंत पलेरिया यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये