रात्रीच्या अंधारात रंगला जुगाराचा डाव
पोलिसांच्या धाडीत रोकड, ताशांची पाने व चटई जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगावमही शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १३ जण ताब्यात, २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगावमही शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १३ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण २७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केला. ही कारवाई २२ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगावमही शिवारात काही जण पैशांची हार-जीत लावून ‘एक्का बादशहा’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत सतिष साहेबराव खिल्लारे याच्याकडून २ हजार ५० रुपये, ज्ञानेश्वर गोपाळ वाघ याच्याकडून १ हजार ७०० रुपये, रवि सुधाकर शिंगणे याच्याकडून १ हजार ८५० रुपये, योगेश प्रल्हाद घुडघे याच्याकडून १ हजार ९५० रुपये, डिंगावर प्रल्हाद भागीले याच्याकडून २ हजार १५० रुपये, परमेश्वर तुकाराम भागीले याच्याकडून १ हजार ९०० रुपये, किसन संतोष सूर्यवंशी याच्याकडून १ हजार ९०० रुपये, एकनाथ अशोक कायंदे याच्याकडून १ हजार ६५० रुपये, संतोष प्रल्हाद भागीले याच्याकडून २ हजार २५० रुपये, तुषार जालिंदर खिल्लारे याच्याकडून २ हजार ५० रुपये, परमेश्वर पंढरीनाथ भागीले याच्याकडून २ हजार ३०० रुपये आणि गणेश माधवराव भागीले याच्याकडून २ हजार ५० रुपये रोख रक्कम मिळून आली.
तसेच नितीन बबन खिल्लारे याच्याकडून २ हजार ४०० रुपये रोख, जुगाराच्या डावावर ठेवलेली १ हजार रुपयांची रोकड, ५२ ताशांची पाने आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली चटई असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २७ हजार ३५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव नारायण कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक ३८७/२०२५, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड, सहाय्यक फौजदार प्रमोद मुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे, बद्रीनाथ डिगोळे, समाधान गीते, शरद साळवे, विजय दराडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल चिंचोले, दसरे आणि गजानन ठाकरे यांच्या पथकाने केली.



