गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहा दारू गाळणारे 04 आरोपीसह एकुण 9 लाख 80 हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही पोलीस स्टेशन, सेलू हद्दीत हिंगणी, वानरविरा, शिवणगाव, गोहदा शिवारात अवैधरित्या गावठी मोहा दारू भट्टी लावून मोहा दारू गाळणारे 04 आरोपीसह एकुण 9,80,900/-रु चा मुद्देमाल जप्त करून नाश केल्याबाबत.

         दिनांक 25/10/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक वर्धा डिव्हिजन परिसरातील पो.स्टे. सेलू हद्दीतील मौजा हिंगणी, शिवणगाव,वानरवीरा, गोहदा शिवारात गावठी मोहा दारू, रसायन सडवाबाबत रेड केला असता 4 वेगवेगळ्या कारवाईत एकूण 1)8,800 लिटर कच्चा मोहा रसायन साडवा, 2)150 लिटर उकडता मोहा रसायन सडवा, 3) 168 लिटर गावठी मोहा दारू, 4) लोखंडी ड्रम, भट्टी साहित्यसह असा एकूण 9,80,900/- रु. चा माल नाश करून 4 आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे 4 वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले.

          सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउनि उमाकांत राठोड, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, मनीष कांबळे, अमोल नगराळे, पवन पन्नासे, धर्मेंद्र अकाली, मिथुन जिचकार, संघसेन कांबळे, नितीन इटकरे, उदय सोलंकी सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये