ऑर्किड रेसिडेन्शियल कॅम्पस येथे गुणवंतांचा सत्कार व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वाळूज सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर येथील ऑर्किड रेसिडेन्शियल कॅम्पस तर्फे आयोजित “गुणवंतांचा सत्कार सोहळा” तसेच “न समजलेले आई-बाप” या प्रेरणादायी व्याख्यानाचा संयुक्त कार्यक्रम आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देऊळगाव राजा येथिल आर्या लॉन मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे योगदान अधोरेखित करत त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. वसंत हंकारे सर यांनी “न समजलेले आई-बाप” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आई-वडिलांचे प्रेम, त्याग, मुलांच्या जडणघडणीत त्यांचे असलेले महत्त्व तसेच कुटुंबातील सुसंवादाची गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित पालक, विद्यार्थी आणि नागरिकांना नवी दिशा मिळाली.तर संस्थेच्या
प्राचार्या सौ.रेणुका काकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्याने स्वतःचे करिअर घडविण्यासाठी ध्येय निश्चिती करने आवश्यक आहे. आपल्याला ज्याही क्षेत्रात जायचे आहे त्यासाठी टार्गेट ठेऊनच अभ्यास करावा.प्रयत्नांती यश मिळे.आमच्या संस्थेच्या वतीने यासाठी विद्यार्थ्यांसाठी अनेक व्यासपीठ ऊपलब्ध करून दिले आहे व कोणता विध्यार्थी कुठे कमी पडतो याचे सूक्ष्म निरीक्षण करुण त्यास येणाऱ्या अडचणी प्राधाण्याने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्रीनिवास नंदामौरी, प्राचार्या रेणुका काकडे, सचिन चव्हाण,डेव्हिड संजय काकडे,पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या व्यवस्थापनाने, शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन व समारोपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



