ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमीचा देवाडा येथे विशेष समर कॅम्प संपन्न 

समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते - श्रीधर मालेकर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमी च्या वतीने महाकाली नगरी देवाडा येथील माणिक कुटी भवनात लहान मुलांसाठी समर कॅम्प चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. एकवीस दिवस चाललेल्या या समर कॅम्पचा समारोप डेबू सावली वृध्दाश्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध समाजसेवी व्यक्तिमत्व एड. पारोमिता गोस्वामी होत्या.प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी उप कार्यकारी अधिकारी श्रीधर मालेकर, डेबू सावली वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, धम्ममित्र नामदेव गेडकर शिबिर संयोजक सौ. रजनी बोढेकर यांची उपस्थिती होती. प्रा. डॉ .श्रावण बानासुरे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी अतिथीच्या हस्ते बेस्ट कॅम्पर अवार्ड कु. अवंतिका बेपारी, खुशबू चिंवडे, कृतिका उईके, कार्तिक पारोधे, करण जरीले, तयाग सकदेव यांना देण्यात आले तर प्रोत्साहनपर पुरस्कार कु. वेणू आवारी, आरोही झाडे, खुशबू काटवले यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

   याप्रसंगी एड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीत नवनवीन कौशल्य शिकण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते. स्व-विकास आणि आनंददायी जीवनानुभव यातून मिळत असते,असे प्रतिपादन केले. तर श्रीधर मालेकर म्हणाले की, समर कॅम्पमधील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. सुभाष शिंदे म्हणाले, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी आणि नवी उर्जा निर्माण होते, असे ते म्हणाले. बंडोपंत बोढेकर यांनी सहभागी पाल्यांच्या पालकांचे कौतुक केले. या कॅम्प मध्ये कराटेचे प्रशिक्षण ब्लॅक बेल्ट विनर कु. प्रगती जेनेकर यांनी दिले तर लाठी काठी चे प्रशिक्षण ऋग्वेद कोंडेकर यांनी दिले.

विविध समुह नृत्याचे धडे कु. रिया पिपरीकर यांनी दिले. कथाकथन व सामान्य ज्ञान सत्रात डॉ. धर्मा गांवडे आणि प्रा. डॉ. श्रावण बानासुरे यांनी मार्गदर्शन केले. समुह गायनाचे धडे बंडू टेकाम गुरूजी यांनी दिलेत तर बौध्दीक खेळ प्रा. नामदेव मोरे यांनी शिकवले. मेडीटेशन व क्राफ्ट संबंधित माहिती मुकूंद दिंडोकर आणि रजनी बोढेकर यांनी दिली. तसेच हास्य योगा अभिजित उल्लेवार यांनी शिकवला तर अरविंद नगरच्या पसायदान योगा ग्रुपच्या सौ. वनश्री मेश्राम, सौ. माधुरी वाटेकर, प्रभाकर राजूरकर,तुकाराम सुरदुसे यांनी शिबिरार्थ्यांना योगा- प्राणायाम आणि आनंददायी खेळ शिकवलेत. समारोपाच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध समाजसेवी व्यक्तिमत्व कर्मयोगी डॉ. शिवनाथ कुंभारे स्मृती सामाजिक सेवा सन्मानपत्र धम्ममित्र नामदेव गेडकर,प्रा. नामदेव मोरे, डॉ. श्रावण बानासुरे यांना प्रदान करण्यात केले. सूत्रसंचालन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवराव कोंडेकर यांनी केले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मराठी ,हिंदी ,संस्कृत श्लोकाचे पाठांतर ऐकवले, हे विशेष.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये