ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायमारा परिसरात हत्तींचे आगमन

नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 गडचिरोली जिल्ह्यातून आलेला जंगली हत्तींचा कळप काल दिवसभर आसोला तलाव परिसरात वास्तव्यास होता. आज सकाळी हा कळप पेंढरी उपक्षेत्रातील सायमारा गाव परिसरात दाखल झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, सदर हत्तींचा कळप पुढील मार्गक्रमण करत ब्रह्मपुरी वनविभागातील शिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या दिशेने जाऊ शकतो. त्यामुळे सायमारा व परिसरातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी अनावश्यकपणे जंगल परिसरात किंवा हत्तींच्या हालचाली असलेल्या भागात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, हत्ती दिसल्यास त्यांच्याजवळ जाण्याचा किंवा छायाचित्रण करण्याचा प्रयत्न करू नये, तसेच कोणतीही माहिती तात्काळ वनविभागाला कळवावी, असेही सांगण्यात आले आहे.

हत्तींच्या कळपाच्या आगमनामुळे सायमारा, पेंढरी व लगतच्या गावांतील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये