प्रविण प्रशिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
क्षमताबांधणी व नेतृत्वविकास विषयांवर सखोल मार्गदर्शन ; प्रशिक्षक विकास राज्य संस्थेचा यशस्वी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ प्रशिक्षक विकास राज्य संस्थेच्या वतीने पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे १६ व १७ जुलै रोजी दोन दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत प्रविण प्रशिक्षकांसाठी क्षमताबांधणी व नेतृत्वविकास या विषयांवर भर देण्यात आला असून, पुढील काळात येणाऱ्या संधी आणि बलस्थानांचा शोधही घेण्यात आला.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रशिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत राज्य प्रशिक्षक संस्थेविषयी माहिती, ध्येय, उद्दिष्ट, दृष्टीं यावर सखोल माहिती देण्यात आली. कार्यशाळेचे उद्दिष्टे, प्रशिक्षक कसा असावा, कौशल्य अवगत होण्यासाठी स्मार्ट उद्दिष्ठ, वर्तणुकीत बदल घडविण्यासाठी ABCD तंत्र, संवाद कोशल्याचे प्रकार, उपस्थिती श्रवण प्रतिसाद, प्रभावी ने्तृत्व, निर्णय प्रक्रिया तसेच फॅसिलेटरची भूमिका इत्यादी विषयावर PPT, वाचनसाहित्य, गटचर्चा, अभ्यासखेळ आणि केसस्टडीच्या माद्यमातून सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेला राज्य प्रशिक्षक विकास संस्थाचे सचिव विलास सुरवसे, सहसचिव गोविंद विभुते, उपाध्यक्ष राहुल बागडे, देविदास पवार यांनी प्रशिक्षकांच्या हिताचे आणि संस्था बळकटीकरण यावर मोलाचे सखोल मार्गदर्शन केले. सोबतच राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विषयांच्या प्रशिक्षणावर सहभाग घेण्यासंदर्भात माहिती दिली. प्रशिक्षकांनी केवळ शासकीय प्रशिक्षणावर अवलंबून न राहता खाजगी औद्योगिक क्षेत्रातील CSR च्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या संधीचा शोध घेण्याबाबत विचामंथन करण्यात आले.
कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुधीर राजगडकर, सचिव अनिल वाकडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रभू गवारे यांच्यासह संदीप पाटील, विलास माटे, चंद्रशेखर कंदालवार, मालती सगणे, अर्चना जणगणवार यांनी अथक परिश्रम घेतले. चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्याच्या संघटना समिती सदस्य यांनी या कार्यशाळेला भरीव योगदान दिले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ५८ प्रशिक्षकांनी सहभाग घेऊन कार्यशाळेचा लाभ घेतला.



