शिवनाला उपसा सिंचन योजनेचा फज्जा, नागभिड तालुक्यातील सहा समित्यांना पाणी पुरवठा हस्तांतरण
योजना कुचकामी ठरत असल्याने शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभिड :- तालुक्यातील शेतकऱ्यांना गोसे खुर्द तलावातील उपसा सिंचन योजना व नहरातून पाणी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी राजकीय व विरोधी हे शेतकऱ्याचे कैवारी असल्याचे दाखवून पाणी देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे मात्र गेली ४० वर्षापासून नागभीड तालुक्यातीलजनतेला पाणी देण्याचे आमिष दाखवून पाने पुसण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागभिड तालुक्यातील सहा गावातील समित्यांना शिवनाला उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली असून गेल्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली परंतु पाणी सोडण्यासाठी उपसा सिंचन अभियंता यांनी योजनेची तपासणी करूनच ( टेस्ट) पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले. याकरिता भाजपचे नेते गजानन पाथोडे यांनी शिवनाला उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना पाणी देण्यात यावे यासाठी प्रयत्न केले. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्याचे कळते मात्र तांत्रिक बाबीमुळे पाणी पुरवठा होत नसल्याने भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपसा सिंचन योजना व नहरातून पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे



