ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत निरंकारी मिशन तर्फे बारई तलावाची स्वच्छता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी:- संत निरंकारी मिशन अंतर्गत दर वर्षी २३ फेब्रुवारी गुरू पूजा दिवस संपूर्ण विश्वात आयोजित केल्या जाते त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविला जातात.

या वर्षी सुद्धा प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या मिशन अंतर्गत विविध जलस्रोतांची स्वच्छता राबविण्यात आली यात संत निरंकारी मिशन ब्रम्हपुरी तर्फे स्थानिक बारई तलावाची साफ सफाई मिशन च्या सेवादल – अनुयायी यांच्या तर्फ करण्यात आली यात नगरपरिषद ब्रम्हपुरी यांचे सुद्धा योगदान लाभले. सर्व प्रथम सकाळी 7 वाजता सेवादल प्रार्थना करून सद्गुरू माता सविंदर हरदेवसीहजी महाराज यांना नमस्कार करून स्वच्छता अभियानाला सुरू झाली व 11 वाजता स्वच्छता अभियानाची सांगता लंगर करून समाप्त करण्यात आली.

या प्रसंगी ब्रम्हपुरी ब्रांच प्रमुख सुयोग बाळबुधे, डॉ.सतीश कावळे,सेवादल इंचार्ज नितीन रासेकर, तसेच बेटाळा,रानबोथाली,वाढोना,मालडोंगरी, नागभीड,बोरगाव,उदापुर,आदी गावातील निरंकारी मिशनचे शेकडो अनुयायी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये