Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

साई मंदिरात श्री साईबाबा स्थापना दिन महोत्सवाला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       शहरातील बगडे वाडी येथील श्री साई मंदिरात श्री साईबाबा स्थापना दिन महोत्सवाला दिनांक 18 पासून सुरुवात करण्यात आली. हा महोत्सव दिनांक वीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे. सकाळी आठ वाजता घटस्थापना तथा श्री साईची आरती करण्यात आली. त्यानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुपारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात तीन दिवसात विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात घटस्थापना, भजन,कीर्तन, एकांकिका, महिलांसाठी कार्यक्रम, समुपदेशन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. दिनांक 19 रोज गुरुवारला सायंकाळी पाच वाजता मंदिरातून श्री साईबाबांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीचे पदाधिकारी तथा सदस्य सहकार्य करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये