मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे मिसींग/बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणा मध्ये वर्धा जिल्हयात अपहरणाचा गुन्हा दाखल करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक, वर्धा यांनी दिले आदेश…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. सर्वोच्च न्यायालय येथे दाखल असलेल्या विशेष हक्क याचीका (कि.), नं. ११२६३/२०२५ त्रि. जी. गणेश विरुध्द तामीळनाडू राज्य व इतर प्रकरणी दिनांक ०५/०३/२०२५ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने मिसींग/बेपत्ता व्यक्तीच्या (प्रौढ Adult) व्यक्तीबाबत पोलीस स्टेशनला तकार प्राप्त झाल्यास त्यामध्ये मिसींग / बेपत्ता प्रकरणा मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावे असा आदेश पारीत केल्यानंतर सदर आदेशाचे अनुषंगाने मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्यांचे कार्यालया कडुन दिलेल्या आदेशांचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मिसींग/बेपत्ता व्यक्तीच्या (प्रौढ-Adult) बेपत्ता झाल्याचे तकार प्राप्त झाल्यास, सदर व्यक्तींचा शोध घेणेसाठी तातडीने गुन्हा दाखल करुन आवश्यक तपास व शोध कार्यवाही करण्यात यावी. असे आदेशीत केल्याने मा. पोलीस अधिक्षक वर्धा यांनी वर्धा जिल्हयातील संपूर्ण पोलीस स्टेशन यांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनांचे तंतोतंत पालन करुन मिसींग/बेपत्ता व्यक्तीच्या (प्रौढ Adult) प्रकरणा मध्ये यापुढे तकार प्राप्त होताच अपहरणाचे गुन्हे (FIR) दाखल करण्याकरीत आदेशीत केले आहे.



