शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करून धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्याचे आश्वासन देऊन रक्कम न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 17/03/2026 ते दिनांक 06/08/2026 या कालावधीत मौजा हिंगणी ता. सेलू जि. वर्धा येथील मे. सर्वज्ञ जिनिंग अँण्ड प्रेसिंग चे मालक संचालक प्रविण भास्करराव बोरकुटे यांनी परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून एकूण 1103.70 क्विटल कापूस खरेदी केला. सदर कापसाची एकूण खरेदी किंमत 91,21,496/- रू. (अक्षरी रुपये एक्याण्णव लाख एकवीस हजार चारशे अठ्ठयाण्णव) इतकी असून, आरोपीने शेतकऱ्यांना कापूस खरेदी केल्याच्या पावत्या देऊन त्याबदल्यात रक्कमेचे धनादेश (चेक) दिले. मात्र आरोपीच्या बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम उप्लब्ध नसल्याने सदर धनादेश वटले नाहीत. त्यानंतर संबंधित पिडीत शेतकऱ्यांनी देय रक्कमेबाबत आरोपीला विचारणा केली असता, त्याने शेतकऱ्यांना दिलेले धनादेश परत घेऊन RTGS द्वारे त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करतो, असे सांगितले. तथापि, शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाची देय रक्कम परत करण्यात आली नाही. या प्रकरणी शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सेलू जि. वर्धा येथे अपराध क्रमांक 634/2026 कलम 316(5), 318(4) भारतीय न्याय संहिता सहकलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट (N.I. Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्याकडून सुरू आहे.
इतर शेतकरी व नागरिकांना आवाहन
सदर प्रकरणातील संबंधित व्यक्ती/जिनिंग ला कापूस विक्री केलेला असूनही कापसाची देय रक्कम अद्याप प्राप्त झ गालेली नाही, असे पिडीत शेतकरी किंवा व्यक्ती असल्यास त्यांनी 1) कापूस खरेदी पावती, 2) देण्यात आलेले धनादेश, 3) धनादेश वटला नसल्यास संबंधित बँक मेमो, 4) RTGS बाबतचे कागदपत्रे इ. पुरावासह आर्थिक गुन्हे शाखा वर्धा, येथे संपर्क साधावा.



