ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतजमीन मालकास डांबून ठेवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे एका शेतमालकाची जमीन स्वतः च्या नावे करण्याच्या उद्देशाने शेतमालकास गेल्या काही दिवसापासून डांबून ठेवणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सौ उज्वला युवराज गवई रा डॉ आंबेडकर नगर, काजुर मार्ग, पूर्व मुंबई यांचे वडील तहसिल कार्यालय, देऊळगाव राजा येथे त्यांच्या नावे असलेली देऊळगाव राजा शिवारातील सर्व्हे न ७/२ मधील एकूण ६.१९ गुंठे जमीन विक्री करण्याबाबत अर्ज करण्यासाठी २४ जुलै ला सकाळी १० वाजता आले असता आरोपी बाबासाहेब सिताराम छडिदार रा सम्राट कॉलनी, देऊळगाव राजा याने शेतमालकाच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांची जमीन स्वतः च्या नावाने करण्याच्या उद्देशाने त्यांना परवानगी बाबत अर्ज करावयास लाऊन त्यांना प्रणव मल्टी सर्व्हिस देऊळगाव राजा येथून कोठेतरी नेऊन बळजबरीने डांबून ठेवण्यात आल्या ची तक्रार फिर्यादी उज्वला गवई यांनी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आरोपी बाबासाहेब छडीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सानप करित आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये