ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा कारागृहातील बंदिवानांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप

जिल्हाधिकार्यांच्या हस्ते वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा वर्धा येथील जिल्हा कारागृहामध्ये विविध गुन्ह्यातील बंदीना ठेवले जाते यातील काही बंदी न्यायालयाने शिक्षा सुनावलेले तर काही बंदी अंडर ट्रायल असतात. या बंदीना कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना हक्काचा स्वयमरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वर्धा जिल्हा कारागृहातील सन २०२२-२३ मध्ये ६० बंदींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे, या मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर, सोशल मीडीया एक्झेकटीव या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण देण्यासाठी प्लाटीनम कॉम्पुटर इंस्टीट्यूट, वर्धा या खाजगी संस्थेची निवड करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण देणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा मार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आलेला होता, या उपक्रमात ३० बंदीबांधवांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून दि १९ जून २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कारागृहात बंदी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकार्यांसह जिल्हा कारागृह अधीक्षक सुहास पवार, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण वर्धा चे प्रमुख विवेक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवाडे, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त नीता औघड, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र आचार्य, प्लाटीनम कॉम्पुटर चे संचालक अजित नेरकर, रुपेश रामगडे,MGNF उपस्थित होते.

मा. जिल्हाधिकारी यांनी कारागृहामधील सर्व बंदिवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेत कारागृह अधीक्षकांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जास्तीत जास्त बंदीवानांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. भविष्यात सुद्धा बंदिवानांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी सूचित केले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या नंतर कारागृहामध्ये स्थापन केलेल्या “हिरकणी कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्घाटन केले. या हिरकणी कक्षाची स्थापना कारागृहातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी करण्यात आलेली आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कारागृह, वर्धा च्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी तुरुंगाधिकारी श्री सुहास नागमोते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड न्यायालयीन बंदी बांधव आणि अंडर ट्रायल बंदी बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये