दारीद्र्यात खितपत असलेल्या विरभद्र समाजाने दिला शिक्षणप्रसाराचा मंत्र
जंगम बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिनी शालेय साहित्याचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कित्येक वर्षांपासून आर्थीक दारीद्र्यात खितपत असलेल्या व शिक्षणापासून वंचीत असलेल्या शहरातील गवराळा येथील विरभद्र (जंगम) समाजाने एक संस्था स्थापन करुन व त्याव्दारे शालेय साहित्याचे वितरण करुन समाजाची प्रगती साधण्यासोबतच शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी केलेल्या या ऊपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.सदर समाज हा अत्यंत मागासलेला असुन शिक्षणाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
मात्र समाजातील काही होतकरु महिला आणी युवकांनी एकत्रीत येत समाजाच्या उत्थानासाठी माला जंगम बहुउद्देशीय विकास संस्थेची स्वातंत्र्यदिनी स्थापणा केली व शिक्षणाला प्राधान्य देत संस्थेतर्फे गवराळा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले त्याबरोबरच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष प्रविण पोटे,संस्थेच्या अध्यक्षा आशा हजारे,सचिव सुनीता हजारे, ऊपाध्यक्षा ज्योती सिंदेवार,इच्छा हजारे,सोनु मिटपल्लीवार,लक्ष्मी मिटपल्लीवार,वंदना सिंदेवार,मिना मिटपल्लीवार, रुपिली सिंदेवार, गंगुबाई हजारे, संगीता गुंटीकवार आदी मान्यवर ऊपस्थीत होते. समाजाचा उध्दार हा केवळ स्त्रियाच प्रामाणीकपणे करु शकते हे या उपक्रमातून दाखवून दिले आहे.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वनिता कोरडे यांनी,संचालन ऊर्मीला बोंडे यांनी तर आभार मसराम मैडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शाळेतील शिक्षकवर्गाने सहकार्य केले.