ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     मागील आठवड्यात परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन कपाशी तूर अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये अंढेरा महसूल मंडळातील जवळपास सर्वच गावांना परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा सामना करावा लागला असल्याने भागातील नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्याकडे केली आहे.

     राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मागील आठवड्यात सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे देऊळगाव राजा तालुक्यामधील अनेक भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये अंढेरा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शेत पिकांचे जास्त नुकसान आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.वेजनीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्याने आणि कपाशीचे बोंडे सडल्याने कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेले सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढलेले आलेले सोयाबीन पिकांची हानी झाली आहे. उत्पादन कमी होत असल्याने शेती पिकांवर केलेला उत्पन्नाचा खर्च निघणे देखील कठीण झाले आहे. शेतकऱ्यांचा दसरा अंधारात गेला आता दिवाळी सणही काळोखेतच जाणार आहे.

यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. अंढेरा मंडळातील पाडळी शिंदे, मेंडगाव सावखेड नागरे, बायगाव,शिवनी आरमाळ, सेवा नगर,अंढेरा या गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी,अशी राष्ट्रवादीने एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे पाटील, किसान सभेचे शिवा नाना शिंदे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, विधानसभा कार्याध्यक्ष रवींद्र इंगळे, रावसाहेब गाढवे, जनार्धन मगर,सचिन कोल्हे,दत्तात्रय जायभाय, सोनू बिल्डर आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये