ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोराचा व्हॉलीबॉल खेळाडू भारतीय तटरक्षक दलात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

लोक शिक्षण संस्था वरोडा व वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा चा राष्ट्रीय वॉलीबॉल खेळाडू नयन प्रदीप वरखडे यांची भारतीय तटरक्षक दल पांडिचेरी येथे सहाय्यक कमांडंट (UT )पदावर नियुक्ती झालेली आहे. नयन हा व्हॉलीबॉल चा उत्कृष्ट खेळाडू असून आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट म्हणून स्थान पटकाविले.

यापूर्वी सुद्धा वरोरा स्पोर्ट फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडाचे खेळाडू शासकीय नोकरीत लागले असून दरवर्षी शालेय व संघटना गटात येथील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतात ही विशेष बाब.

 नयनच्या नियुक्तीचे वरोरा शहरात सर्वत्र कौतुक करण्यात येत असून, आपले श्रेय लोक शिक्षण संस्था वरोडा चे अध्यक्ष प्रा. श्रीकांत जी पाटील, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकृष्ण जी घड्याळ पाटील, कार्यवाह विश्वनाथजी जोशी, अड. दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे,ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुनील बांगडे, वरिष्ठ खेळाडू मुकुल कातांगडे, देवानंद डुकरे, विनोद उमरे, सागर कुरेकार, श्री संजयजी अंबुलकर, अनिल घुबडे, निखिल बोबडे गणेश मुसळे, दुष्यंत लांडगे, उत्तम देऊळकर, वडील प्रदीप वरखडे व आई सविता वरखडे यांना देतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये