Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कॉलेज मध्ये बसने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीस ०३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येथील गा श्री व्हि. पी.आदोने सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०४ वर्धा यांनी आरोपी नामे आरिफ खान उर्फ चुहा गुलाब खान पठाण वय २४ वर्ष रा. बनारस ह.मु. वर्धा यास १) कलम ३५४,३५४(अ) (१) (३) ५०९ भादवि व कलम ८ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व दंड न भरल्यास ३,०००/-रु. दंड व ०१ महीना सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. व पिठीतला त्यापूर्ती पोटगी २,०००/- दंडाचे रक्कमेतुन अपील कालावधी संपल्यानंतर देण्याचे व कलम ३५७(२) पौ.प्र.स. आणि कलम ७ पोक्सो मधील तरतुदी नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांनी क्षतीपुर्तीची प्रावधान निश्चीत करावे असेही आदेशीत केले. हकिगत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीत्त हि आष्टी येथुन कॉलेज मधुन बसने राळेगांव (शाप) येथे बसस्थानकावर उत्तरली तेव्हा यातील नमुद आरोपी याने पिडीत मुलीला डोळा मारुन, कमरेला हात, लावुन अल्पवयीन पिडीत मुलीचा विनयभंग केला पिडीतेने आरोपीस तु थांब अशे कशे मला हात कशाला लावला, कोण आहे तु असे म्हटले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता बस स्टॉफ वरील लोकांनी त्याला पकडले त्यानंतर पिडीत मुलीने तिच्या वडीलांना फोन करुन बोलविले व पोलीस स्टेशन तळेगांव (शा.) येथे लोकांच्या मदतीने पिडीतेच्या वडीलांनी नमुद आरोपीला घेवुन गेले व फिर्यादीने रिपोर्ट नोंदविल्या वरुन पो स्टे अधिकाऱ्याऱ्यांनी गुन्हा नोंद केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क्र. ४७५/२३ कलम ३५४,३५४ (अ),५०९ भादवि सह ८ पोक्सो नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.

सरकार पक्षा तर्फे एकुण ०५ साक्षीदार तपासले ज्यात प्रत्यक्षदर्शी खंबीर साक्षीदारांची भुमीका, पिडीत, पिडीतेचे वडीलांची साक्ष जन्म प्रमाणपत्रा बाबत मुख्याध्यापकांची साक्ष व तपास अधिकारी सपोनि/धनश्री कुटेमाटे यांची साक्ष मोलाची ठरली सरकारतर्फे अति. सरकारी वकील, श्री. एच.पी. रणदीवे यांनी कामकाज पाहीले तसेच त्यांना पैरवी अधिकारी मपोशि/१६०८ वैशाली ठाकरे, पो.स्टे. तळेगांव व इतर पैरवी बांधवांनी साक्षदारांना मा न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली याप्रकरणी अति. सरकारी अभियोक्ता यांचे यशस्वी युक्तीवाद ग्राह्य धरून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ (श्री. व्ही.पी. आदोने) साहेब यांनी आरोपीस दिनांक ०४/०९/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये