Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारचाकी वाहनासह देशी विदेशी दारुचा एकूण 11 लाख 48 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 04/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथके पो. स्टे. खरांगणा परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून यातील पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 12 MW 6068 ने मांडवा मार्गे आंजी (मोठी) येथे त्याचे ताब्यातील गाडीमध्ये विदेशी दारू चा मुद्देमाल घेऊन येत आहे.

अशा माहितीवरून सदर ठिकाणी नाकेबंदी केली असता सदर वाहन येतांना दिसून येताच पोस्टाँपचे मदतीने नाकेबंदी करून सदर वाहनातील वाहन चालक आरोपी – 1) चेतन गंगाधर कठाणे, वय 28 वर्ष, राहणार – वायफळ तहसील जिल्हा वर्धा, व त्याचा साथीदार – 2) योगेश साहेबराव येळने, वय 29 वर्ष, राहणार – वार्ड क्रमांक 7 चिंतामणी लेआउट देवळी तहसील देवळी जिल्हा वर्धा, हे मिळून आले त्यांचे ताब्यातून 1) 03 खर्डाच्या खोक्यात रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 144 सिलबंद शिश्या प्रती नग 350/-रू प्रमाने किंमत 50,400/-रू. 2) 06 खर्ड्याच्या खोक्यात ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 276 सिलबंद शिश्या प्रती नग 350/-रू प्रमाने किंमत 96,600/-रू. 3) एक पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 12 MW 6068 किमत 10,00,000/-रू 4) एक जिओ कंपनीचा कीपॅड मोबाइल किंमत 1,000/रू  असा एकुण जु.कि. 11,48,000/-चा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपी त्यांना सदर जप्त मुद्देमाल कुठून आणला याबाबत विचारले असता आरोपी क्रमांक 3) बार मालक – राजू भांडारकर, राहणार – विरुळ (बघाजी), तहसील जिल्हा अमरावती याचे कडून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याने तिन्ही आरोपीतांविरुध्द पो. स्टे. खरांगना येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

 सदर कारवाई – मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा,पो. उप. नि. अमोल लगड, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, गजानन लामसे, रितेश शर्मा, महादेव सानप, पोलीस अंमलदार मनिष कांबळे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, अखिलेश इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये