ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संशोधन हे समाज हिताचे असावे – डॉ.सिद्धनाथ भोसले

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे आंतरविद्याशाखिय इनोव्हेटिव्ह ट्रेंड इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. आयोजित राष्ट्रीय परिषदेला बीजभाषक म्हणून उपस्थित असलेले डॉ.सिद्धनाथ भोसले संशोधन छोटे असावे परंतु ते समाज हिताचे असावे असे महत्त्वपूर्ण भाष्य केले.

संशोधन क्षेत्रातील भारतीय जर्नल ला कमी न लेखता आपणच आपल्या संशोधनाच्या माध्यमातून त्यांना मोठं केलं पाहिजे भारतीय जर्नल सुद्धा आज संशोधन क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असून लोकल ते ग्लोबल चा आजचा काळ आहे असं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन भोसले यांनी केले. या परिषदेचे उद्घाटक गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताळे हे होते. अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार होते .या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आशिष लिंगे ,डाॅ.ए.चंद्रमौली,सौ.नंदाताई अल्लूरवार  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या राष्ट्रीय परिषदेचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांनी केले याप्रसंगी राष्ट्रीय परिषदेच्या सोविनियरचं मान्यवरांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आलं.

या परिषदे करिता विविध महाविद्यालयातील सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. आशिष लिंगे यांनी संशोधन निरंतर चालणारी प्रक्रिया असून संशोधनाकडे गांभीर्याने बघून मूलभूत आणि ज्ञानात नवी भर घालणारे संशोधन करणे आजची काळाची गरज आहे असं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. उद्घाटक म्हणून  मनोगत व्यक्त करताना डॉ. अनिल चिताळे  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याची अंमलबजावणी करत असताना संशोधन आणि कौशल्य विकास अतिशय महत्त्वाचा असून नवी पिढी सक्षम बनवण्यासाठी कार्य करणे गरजेचे असून नवनवीन ज्ञानाच्या निर्मितीमध्ये संशोधकांनी आपली ऊर्जा खर्च करावी असे महत्त्वाचे विधान केले उद्घघाटनीय सोहळ्याचं संचालन डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी केलं तर आभार राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. दिलीप कामडी यांनी मानले यानंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेंतर्गत टेक्निकल सेशन घेण्यात आलं या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. उत्तमचंद कांबळी, डॉ. जयदेव देशमुख, डॉ. तेलखेडे तर साधन व्यक्ती म्हणून डॉ. नंदाजी सातपुते डॉ. विवेक गोरलावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या टेक्निकल सेशनमध्येजवळपास ३० संशोधकांनी आपले पेपर सादर केले त्यानंतर पोस्टर कॉम्पिटिशन सुद्धा यावेळी घेण्यात आली. या सत्राचे संचालन डॉ. विजयसिंह पवार, डॉ. प्रकाश घागरगुंडे यांनी केलं. समारोपीय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ए. चंद्रमौली, डॉ. संजय बेले, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. विवेक गोरलावार, डॉ. राजेंद्र झाडे, डॉ. तेलखेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते समारोपीय सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले तरआभार परिषदेचे समन्वयक प्रा.प्रशांत वासाडे यांनी मानले.

या परिषदेच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये