पोळसा येथे तेलंगणा सिमेवर रास्ता रोको आंदोलन
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विराआंस समितीचे आंदोलन
चांदा ब्लास्ट
विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी संपुर्ण विदर्भातील सिमावर्ती भागातील रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलनाची मालिका सुरू केली आहे. याच माध्यमातून दिनांक ८ फेब्रुवारी २०२४, रोज गुरूवार ला दुपारी १ वाजता गोंडपिपरी तालुक्यातील पोळसा पुल येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सिमेवर हे आंदोलन होणार असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या या आंदोलनाला शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी आणि शेतकरी युवा आघाडीने पाठींबा घोषित केला आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप या आंदोलनाचे नेतृत्व करणार असून आंदोलनाला कार्यकर्ते व विदर्भप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.