गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने बॅंकेमध्ये हातचलाखी करून काही रक्कम केली लंपास

आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकिकत याप्रमाणे आहे कि, फिर्यादी रंजना दिगांबर वाघाडे रा. बाभुळगाव बोबडे, तह. देवळी ह्या दि. 20/02/2024 रोजी दुपारी पुलगाव येथील बॅक ऑफ इंडिया येथून बचत गटाचे 40,000 रू काढले होते व ते पैसे बॅंकेतील एका खुर्चीवर बसुन मोजत होते. तेव्हा एक अनोळखी ईसम त्यांचेजवळ आला व पैसे मोजण्याचे बहानाने पैसे त्याने स्वतः जवळ घेतले व हातचलाखी करून परस्पर 16,000 रू घेवुन गेला. त्यानंतर फिर्यादीने पैसे मोजले असता, त्यामध्ये 16,000 रू कमी मिळुन आल्याने, त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांना समजुन आल्याने त्यांनी दि. 21/02/2024 रोजी पोलीस स्टेशन पुलगाव येथे रिपोर्ट दिल्यावरून अप क्र. 172/2024 कलम 406, 420 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पथक करीत होते. त्यादरम्यान दि. 28/02/2024 रोजी मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी नामे नासिर अली आमीर अली, वय 45 वर्ष, रा. ग्रामपंचायत समोर येरखेडा, तह. कामठी, जि. नागपुर यास त्याचे राहते घरून ताब्यात घेवुन, सखोल विचारपुस केली असता, आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन, त्याने फसवणुक करून चोरी केलेल्या 16,000 रू पैकी काही रक्कम त्याने त्याचे आईचे उपचाराकरीता खर्च केली असून, त्याकडे 4,710 रू. शिल्लक असल्याचे सांगितलेवरून, सदर रक्कम जप्त करून, आरोपी व जप्त रक्कम पो.स्टेे. पुलगाव यांचे स्वाधीन करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. डॉ. सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा. श्री. संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नी. संतोष दरेकर, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. अरविंद येनुरकर, संजय बोगा, पो.अं. विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये