Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैध दारूची वाहतूक संबंधाने कारवाई

स्विफ्ट डिझायर वाहनासह एकूण 6 लाख 75 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       सविस्तर असे की, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने मुखबिराच्या गुप्त खबरेवरून पो.स्टे. देवळी हद्दीत नाकाबंदी केली असता यातील आरोपी हा आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कंपनीच्या वाहनांमध्ये वरनमूद दारूचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला. सदर माल कुठून आला याबद्दल आरोपी क्रमांक यास विचारणा केली असता त्यांनी एमपी ट्रेडर्स कळम जिल्हा यवतमाळ येथून खरेदी केला असल्याबाबत सांगितले आहे. करिता एकूण जुमला किंमत, 6,75,900/- रु. चा माल आरोपी 1) चंदन उर्फ आकाश रामचंद्र येंडाले, वय 30 वर्ष, रा. स्टेशन फेल वर्धा,  च्या ताब्यातून जप्त करण्यात आला असून आरोपी  1) चंदन उर्फ आकाश रामचंद्र येंडाले, वय 30 वर्ष, रा. स्टेशन फेल वर्धा,  आरोपीस अवैधरित्या दारूचा माल पुरविणारा MP ट्रेडर्स वाईन शॉप, कळंब, जि. यवतमाळ या दोघांविरुद्ध पो.स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 1) एक ग्रे रंगाची MARUTI SWIFT DIZRE कार क्र. MH-01 BB 3471, कि. 6,00,000 रू. 2) RS कंपनीच्या 180 ml च्या विदेशी दारूने भरलेल्या 66 नीपा प्रत्येकी 350 रू प्रमाणे 23,100 रू 3) 180 ml ने oc Blue कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 48 निपा प्रत्येकी 350 रू प्रमाणे 16,800 रू 4) 180 ml च्या OC प्लेन च्या 96 निप 300 प्रमाणे 28,800 5)500 ml ची tunarg बिअर डब्बे 24 नग 300 रू प्रमाणे 7,200 रू असा जु.किं. 6,75,900 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो. उपनि. अमोल लगड, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये