ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली नगरपंचायत अंतर्गत बगीचाचे काम निकृष्ट

नगरपंचायतीचे दुर्लक्ष!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

नगरपंचायत द्वारा शहरात दोन बगीचे निर्माण करण्यासाठी 52 लाख रुपयांच्या निधी मंजूर करून रोहित गेडाम या कंत्राट दारास बाग निर्माण करण्याचे कंत्राट दिलेले होते दिनांक 28/ 4/2021ला कंत्राट दिले होते तीन महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करण्यात यावे अशी अट घातलेली होती परंतु दोन वर्षाच्या कालावधी पूर्ण झाला तरीही दोन बगीचे चे काम पूर्ण झालेले नाही याउलट एकोणवीस लाख रुपयाची निधी बिल तत्कालीन मुख्याधिकारी यांनी अदा केले तसेच सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे असा ठपकाही ठेवला होता परंतु विद्यमान प्रभारी मुख्याधिकारी यांनी सदर बांधकामाची शहानिशा न करता नगरपंचायत पदाधिकारी यांच्या तोंडी सूचनानुसार संबंधित कंत्राट दाराने बांधकाम करण्यास सुरुवात केलेली आहे तीन महिन्याचे आत काम पूर्ण केलेले नसतानाही सदर कंत्राटदारावर कोणतीच कारवाई न करता उलट बांधकाम करण्यास सांगितले याचे आश्चर्य जनतेमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित कंत्राटदारांनी बागेचे बांधकामास सुरुवात केलेली आहे परंतु सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी स्वतः नगरसेवकाने दिं. १८/०१/२३ ला निवेदन देऊनही सी. ओ. व इंजिनिअर यांनी दुर्लक्ष करून सी. ओ. व इंजिनिअरने पुढाकार घेऊन निकृष्ट बांधकामास मुक संमती कुणाच्या आशीर्वादाने दिली हे सुध्दा गुलदस्त्यात आहे…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये