Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्टॉपवर मोबाईल चोरी करणाऱ्या चोरा कडून तीन चोरीचे मोबाईल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोस्टे वर्धा शहर हद्दीत बस स्टॉप येथे मागील काही दिवसापासून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्यात दि /०६/३०२४ रोजी पोस्टे :-वर्धा शहर अप. क्र. 796/24 कलम 379 भा.द.वी अन्वये अजुन एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावरून सदर गुन्ह्यात फिर्यादी यांनी दाखवलेली समयसूचकता तसेच सायबर सेल यांचे कडून तांत्रिक मदत घेऊन व माहितीच्या आधारे नितेश गोंधळकर रा कुरझाडी जामठा यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असता त्याचे ताब्यातून चोरीस गेलेला माल :-1) One Plus कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल कि 27,000/- रु 2) एक रियलमी कंपनीचा मोबाईल कि 15,000/- रू 3) एक ओपो कंपनीचा मोबाईल कि 10,000/- रू असा जु.कि 52,000/- रू चा माल मुद्देमाल माल मिळुन आल्याने सदर मोबाईल जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून पुढील कार्यवाही करिता सदर जप्त मालासह व कागदपत्रासह पोस्टे वर्धा येथे देण्यात आले.

सदर कारवाई ही मा. श्री नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, पो नि संजय गायकवाड स्था.गु.शा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो. उपनि. कुरेशी, पो हवा नरेंद्र पाराशर, पो. ना. नितीन इटकरे, पो. का. संघसेन कांबळे, सायबर सेल चे पो. हवा. दिनेश बोथकर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये