ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय,गडचांदूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे उपप्राचार्य प्रा प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक एच बी मस्की होते.

सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,प्रा,माधुरी पेटकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.सुधीर थिपे यांनी केले. याप्रसंगी दिन विशेष समिती प्रमुख प्रा.नंदाताई भोयर,इतर सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये