ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत पिकअप वाहनाचा शोध; चालकाला अटक

गोंडपिपरी पोलिसांची तत्पर कारवाई, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ शहरातील रासबिहारी जिनिंगजवळ १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करताना गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या पिकअप वाहनाचा शोध घेतला. पोलिसांनी वाहनचालकाला अटक करून पिकअप वाहन जप्त केले आहे.

मृत व्यक्तीची ओळख मनोज बिच्चू मडावी (रा. गेरी पोस्ट महागाव, ता. अहेरी, जि. गडचिरोली) अशी आहे. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास गोंडपिपरी येथील रासबिहारी जिनिंगजवळ वाहनाच्या धडकेत मनोज मडावी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर गोंडपिपरी पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून अपघाताच्या वेळी तेथून गेलेल्या वाहनांची माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान अपघातात सहभागी असलेल्या पिकअप वाहन क्रमांक आरजे ४३ जीए ८९४३ ची ओळख पटली.

त्यानंतर पोलिसांनी वाहनचालक लक्ष्मण राम पद्मा राम, रा. आष्टी (मूळ रा. राजस्थान) याचा शोध घेत त्याला अटक केली. अपघातास कारणीभूत ठरलेले पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या वतीने सुरू असून, अपघाताची नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोह. विलास कोवे, पोअ. प्रशांत नैताम, आकाश गुंजकर, प्रवीण कदम यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये