Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो तर्फे भव्य रक्तदान शिबीर व रक्तगट तपासणी

ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

       येथील नुकताच ओकीनावा मार्शल आर्ट कराटे डो सेंटर व श्री हनुमान जन्मोस्तव समिती तर्फे भव्य रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी तथा ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम तसेच विविध इतर कार्यक्रम संपन्न झाले.

      रक्तदान शिबीर डॉ शिंदे हॉस्पिटल जवडील हनुमान मंदिर परिसर मेन रोड भद्रावती येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटन सतीश वनकर (कराटेपटू) यांनी केले तर दीप प्रज्वलन करून स्वर्गीय प्रकाश कोवे व मुन्ना शर्मा यांच्या प्रतिमेला पूजन आणि माल्यारपन करण्यात आले. कराटे अकादमीच्या विदयार्ध्यानीं व कराटे पटूनि स्वर्गीय प्रकाश कोवे व मुन्ना शर्मा यांना श्रद्धांजली ( बो ) अर्पण करून त्यांना मानवणंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पवन हुरकट ( कराटेपटू ) हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अनिल मोडक (कराटेपटू) बांधकाम व्यावसायिक, रत्नाकर साठे (कराटेपटू) सामाजिक कार्यकर्ता, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे (कराटे पटू), राजू गैनवार (कराटेपटू) माजी नगरसेवक, विनोद वानखेडे (कराटेपटू) माजी नगरसेवक इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्याच प्रमाणे ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप डॉ. नितीन सातभाई ( कराटेपटू ) वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भद्रावती व डॉ. मयूर जिवणे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांच्या उपस्तिथीत करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या पथकाने काम सांभाळले.

       या रक्तदान शिबिरामध्ये विशेष म्हणजे पाच महिला व साठ पुरुषांनी रक्तदान केले अशा

65 रक्तदात्यांनी उस्फुर्त मतांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना, क्रीडा संघटना व इतर संघटनानी तथा शेकडो युवक – युवतीनी मोठया संख्येनी उपस्तिथ दर्शविली होती. या कार्यक्रमाचे संचालन ललित कोलते यांनी केले, प्रास्ताविक मनोज पाझारे यांनी केले तर आभार रवींद्र राव यांनी केले.

             हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता श्रीराम रुयारकर, अनिल डोये, विनोद रुयारकर, प्रशांत बरडे, शैलेश बंडावार, प्रशांत इंगळे, राजू डाखरे, मोहन कोवे, चंदू खाडे, सुभाष पिदूरकर, संतोष लामकासे, अशपाक अली, निलेश जैन, मंगेश स्वान इत्यादी कराटेपटू व पदाधिकारी सदस्य गंणांनी अथक परीश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये