ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाथरी येथील बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका संपन्न

यावेळी बौद्ध समाज कमिटीचे सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचाराकरिता जीवन सुधारक बुद्ध विहार पाथरी येथे गुरुवारला वर्षावास प्रवचन मालिका हा कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून बौद्ध समाज पाथरीचे अध्यक्ष सतीश भाऊ उंदीरवाडे तर उपाध्यक्ष प्रशांत उंदीरवाडे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बौद्ध समाज पाथरीच्या महिला अध्यक्षा मंदाताई कसारे तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्या कौशल्याबाई भैसारे,सुमनबाई वाघमारे,दीपमाला ताई अंबादे, महानंदा वालदे, संगीताताई साखरे, अनुप वालदे, भारत लाडे, उमाजी भैसारे, तसेच बौद्ध समाज कमिटीचे सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मार्गदर्शक म्हणून लाभलेले लोमेश जी खोब्रागडे केंद्रीय शिक्षक सर यांनी सर्व उपासकांना भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत या विषयावर मार्गदर्शन केले तसेच घनश्यामजी भडके माजी केंद्रीय शिक्षक यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनात यशस्वी होण्याकरिता बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही असे मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात बहुसंख्येने उपासिका हजर होत्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समस्त महीला बौद्ध कमिटीचे योगदान लाभले व पाथरी येथील महिला बौद्ध कमिटीच्या सचिव डॉ. योगिता सुजित भसारकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये