मोहम्मद शरीफ गुरुजी यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :- नगर परिषद बल्लारपुर द्वारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहम्मद शरीफ यांची स्वच्छता दुत (ब्रँड अॅम्बेसेडर) पदी नियुक्ती करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण 2023-24 व माझी बंसुधरा अभियान 4.0 अंतर्गत नगर परिषद बल्लारपुर परिसरात स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वंसुधरा अभियान अंतर्गत शहरात विविध प्रकारचे स्वच्छतेवर आधारित विविध कार्य करित असल्याने नगर परिषद स्वच्छता दुत (ब्रेड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती करण्यात आले.
मोहम्मद शरीफ गुरुजी यांचा कार्याची दखल घेत नगर परिषद ने त्यांना स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या सफाई तसेच इतर उपक्रम तसेच करीत असलेल्या कार्याबाबत माहिती देण्यात येवून सतत कार्य करीत असल्याने त्यांचे कार्य बघुन इतर नागरिकांच्या मनात स्वच्छताबाबत आदर निर्माण होउन शहरामधील प्रत्येक वार्ड मध्ये स्वच्छतेचे कार्य सुरु राहण्यास मदत होईल.
१६ जुलै रोजी नगर परिषद तर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे पर्यवेक्षक कुणाल कौरासे, सपना रेबेल्ली व अश्विनी मेश्राम यांचा हस्ते स्वच्छता दुत (ब्रेड अॅम्बेसेडर) नियुक्ती पत्र दिले.
					
					
					
					
					


