ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी उद्या विज्युटाचे धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट

 विदर्भ जुनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा) तर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार उद्या दि. ११ डिसेंबरला विधिमंडळावर आयोजित धरणे आंदोलनाची तयारी सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि शिक्षक एकजुटीचे सामर्थ्य दाखविण्यासाठी हे आंदोलन लक्षवेधी ठरणार आहे.

          कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या न्याय्य मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांची पूर्तता तातडीने व्हावी, यासाठी विजुक्ताच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे उद्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन होणार आहे. विज्युक्टाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलन सहभागी व्हावे. याकरिता प्रत्येक तालुक्यातून बहुसंख्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उपस्थित राहून आंदोलनास बळ द्यावे,असे आवाहन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, प्रसिद्धी प्रमुख प्रा. नामदेव मोरे,संघटन सचिव प्रा मालेकर, जिल्हा तथा तालुका कार्यकारणी कडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये