ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे कृष्णजन्माष्ठमी जल्लोषात साजरी

चांदा ब्लास्ट

मैत्री आठवली की आठवतं ते बालपण, बालपणीचे मित्र, मैत्रिणी आणि ती मज्जा. मैत्री कशी असावी याचे उदाहरण द्यायचे झाले तर कृष्ण आणि सुदामा हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या मैत्रीत निःस्वार्थपणा आणि प्रेमयुक्त आदर आपल्याला पहायला मिळतो. ही मैत्रीची आणि सहकार्याची भावना आपल्या चिमुकल्यांमध्ये रुजवण्यासाठी चांदा पब्लिक स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दही हांडीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने आणि कृष्ण भजनाने करण्यात आली. शाळेचे प्रांगण जणु वृंदावन वाटत होते. कारण सर्वांनी कृष्ण आणि राधाची वेशभुषा केली होती. त्यानंतर चिमुकल्यांनी कृष्णकथेवर आधारित नृत्य सादर केले व दही हांडीत उत्साहाने सहभाग घेतला.

दही हांडीनंतर पुर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आणलेली सामग्री एकत्र करीत त्याचा काला तयार करून तो सर्वांनी आनंदाने ग्रहण केला. अशा प्रकारे सर्वांनी फुल न फुलाची पाकळी देत आपला सहभाग दाखवत समानतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी बालगोपालांचे तोंडभरून कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी कृष्ण जन्माच्या निमित्ताने मुलांना मित्रता आणि समानतेचे महत्त्व समजावुन सांगितले.

हा कार्यक्रम पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका रिना शाहा यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका पुजा मिश्रा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाची भुमिका बजावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये