ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालकुमारांची ऑक्सीजन पार्कला भेट

वृक्ष, प्राणी, निसर्गाबद्दल घेतली माहीती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक साईप्रकाश कला व शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा आयोजित बालकुमार फन एंड लर्न या उन्हाळी सुट्टी विशेष उपक्रमाची क्षेत्रीय भेट सहल स्थानिक गोशाला- ऑक्सीजन पार्क ला नेण्यात आली. यामध्ये वय वर्ष ५ ते १५ या वय गटातील मुलांना गायींबद्दल, आपल्या शेती प्रधान संस्कृती, पर्यावरण व निसर्गाबद्दल माहिती देणे व वृक्ष, प्राणी संवर्धन संस्कार रुजवणे हा उद्देश्य होता.

येथे विद्यार्थ्यांना गायीच्या विविध जाती, त्यांच्या दूधापासून तयार होणारे पदार्थ, शेणखत, गोमुत्र यांचे उपयोग, त्याचप्रमाणे गायींच्या मुलांना काय म्हणतात, मानवी जीवनात गायींचे महत्व, गायींस गोमाता का म्हणतात? ते प्रत्यक्ष जाणून घेतले.

याशिवाय ऑक्सीजन पार्क चे काळजी वाहक देवानंद नगराळे यानी बहुसंख्येने असलेल्या कडूनिंब व इतर ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात देणाऱ्या दुर्मिळ वृक्षांबद्दल माहिती दिली. औषधी व फुलझाडांच्या प्रजातीबद्दल माहिती दिली.

या क्षेत्रीय भेटी मध्ये मुलांच्या ज्ञानात बरिच भर पडली आणि त्यांनी यावर अहवाल लिहून शिक्षकांना दाखविले. यावेळी सहायक प्रशिक्षक शालिक दानव, क्षितिज शिवरकर, विनोद ठमके, नेहा प्रसाद, हर्षदा हीरादेवे, प्रवीण चिमुरकर, योगिता चिमूरकर, देवयानी रामटेक, स्मिता गुंडावर सोबत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये