ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 12 विविध कुंटुबांना मानस संस्था अंतर्गत आर्थिक सहाय्य व 51 झाडाचे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न.

कु. तेजस्वी शांताराम पदिले, कोषाध्यक्ष मानस संस्था  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 12 विविध कुंटुबांना मानस संस्था अंतर्गत आर्थिक सहाय्य.संपुर्ण वर्धा जिल्हयामध्ये येत्या वर्षभरात वृक्षरोपन तसेच संगोपन करण्याचा मानस. 

वर्धा : वर्धा जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी गोरगरिब कुंटुब यांची मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या आहेत. अशाच ठळक 12 विविध ठिकाणी भेट देऊन संस्था अंतर्गत पाहणी करण्यात आली व नुकसान झालेल्या गोरगरिब कुंटुबांना संस्थेकडून शक्य तितकी आर्थिक सहाय्य करण्यात आले. नुकसान झालेल्या नागरीकांना यापुढे संस्थामार्फत कुठल्याही प्रकारे मदत लागल्यास संस्था वेळोवेळी त्यांच्या पाठीशी उभी राहिल, असे प्रतिपादन संस्थेचे कोषाध्यक्ष कु. तेजस्वीताई शांताराम पदिले यांनी व्यक्त केले

तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष कु. तेजस्वीताई शांताराम पदिले यांच्या सहयोगाने 51 झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले. तसेच संस्था मार्फत वृक्षरोपण करण्यात आलेल्या या 51 झाडाला संगोपन करण्याचा मानस घेण्यात आला.

वृक्षरोपन कार्यक्रमाची सुरूवात जिल्हा क्रीडा कार्यालय वर्धा येथुन करण्यात आली. वृक्षरोपण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा कार्यालय विभागातील मा. निमगडे साहेब, श्री. रवीभाउ काकडे, संस्थेचे सचिव लवकुमार दिलीप नाईक, कोषाध्यक्ष कु. तेजस्वीताई शांताराम पदिले, कु. प्रियंकाताई हरिभाउ पाचखंडे, शैलेष पाटील, रविंद्र चाफले तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये