ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“सुंदर माझे उद्यान” या स्पर्धेत शहरातील श्रद्धानगर येथील ‘श्री स्वामी समर्थ उद्यान’ सहभागी

महानगरपालिकेचा आयोजित उपक्रम अतिशय स्तुत्य असून नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “सुंदर माझे उद्यान” या स्पर्धेत चंद्रपूर शहरातील श्रद्धानगर येथील श्री स्वामी समर्थ उद्यान सहभागी झाले असून उद्यानाच्या स्पर्धेसाठी उद्यान समितील सदस्य व स्वयंसेवक उत्फूर्तपणे कामाला लागले आहे. उद्यानातील स्वच्छतेला सुरूवात केलेली आहे.

या उद्यानातील उपक्रमात सौंदर्यीकरण, लोकसहभाग, आरोग्यदायी उपक्रम, जनजागृती, कचऱ्याचे वर्गीकरण, वृक्षारोपण, पर्यावरणावर आधारित व इतर उपक्रम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमात खालील स्वयंसेवक सहभागी झालेले असून आणखी कार्यकर्ते सहभागी होणार आहे. चंद्रशेखर कोडगीलवार, सुधाकरराव टिकले, प्रभाकर वांढरे, दिलीप कामडे, मारोती बोथले, जितेंद्र इटनकर, संजय कोट्टावार, अमोल बोगावार, धनराज नागापूरे, प्रदीप इटनकर, प्रदीप कथले, माणीकराव राउत, प्रमोद सुरकार, निलेश तराळे, प्रभा सुरकार, संतोष वाघाडे, रमेश खंगार, घनशामजी तालेवार, मधुकर दानव, सचिन इमले, डोमाजी पिसे, संगीता बच्चूवार, ज्योती मशारकर, लक्ष्मी काळे, समीक्षा कोंडे, निधी ढवळे माधुरी खंगार, सावित्री मेश्राम, राणी केसरे, साधना हिरवानी, आशाताई बेले, वर्षा निकोडे, रंजना कथले, अंकीता घटे, अल्का पिदुरकर, संगीता दुधलवार, किशोर उपरे, चंदन दोहतरे, निखील बनसोड, विनम पाटील, शर्वरी पारसे, आदित्य करपाते, अश्विन कुरेकर, बालाजी इटनकर, चंदा साखरकर, विद्या महाजन, आशा टिकले, शोभाताई कडू, उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये