ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नदी घाट येथे चोरटी रेतीवर रेड

एकूण 7 लाख 55 हजारांवर मुद्देमाल जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

CIU टीम ने पो. स्टे.दहेगाव हद्दीत सावंगी दर्डा येथील नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड केले आहे असता एकूण मुद्देमाल 7,55,000/-₹ जप्त केला आहे.

कारवाईत सदर मुद्देमाल 1) एक नवीन लाल रंगाचा Mahindra575DI ट्रॅक्टर क्रमांक MH 32AH 8164 किंमत 6,00,000/-₹ 2) एक लाल रंगाची क्रमांक नसलेली नवीन ट्रॉली किंमत 1,50,000/-₹ व 3) ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 5,000/-₹ असा एकूण किँमत 7,55,000/-₹ चां मुद्देमाल पकडुन व आरोपी 1) चालक प्रफुल बबनराव दांडेकर वय 38 वर्षे रा. मांडगाव, 2) मालक – सुरेश डांगरी रा. मांडगांव घटनास्थळावर पो. स्टे.दहेगाव चे डुटी अधिकारी व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

     सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, पो. अम. संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये